प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मौजे पांगरे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार नारायण आबा पाटील युतीचे उमेदवार श्री. भैरवनाथ दत्तु हराळे हे विजयी झाले आहेत. पांगरे येथे प्रभाग क्रमांक २ मध्ये ही निवडणूक लागली होती.
या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवार भैरवनाथ दत्तू हाराळे हे ४०९ पैकी १९८ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर शंकर काशीनाथ गुटाळ यांना ११९ मते, महेश आत्माराम शेळके यांना ८५ मते तर नोटाला ०७ मते मिळाली आहेत.
पांगरे गावातील प्रभाग क्रमांक- २ मधील ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चांगदेव गुटाळ यांनी राजीनामा दिलेला असल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत संजयभाऊ गुटाळ (संजय मामा शिंदे पॅनल) रामराव पारेकर व चंद्रकांत पाटील (नारायण पाटील पॅनल) यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे उमेदवार भैरवनाथ हराळे हे विजयी झाले आहेत.
यावेळी शिंदे व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तसेच पिंटू पाटील, भारत टेकाळे, संदीप गुटाळ, नागेश शेंडगे, संतोष गुटाळ, गहिनीनाथ गुंजाळ, सचिन टेकाळे, बंडू गुरव, अमोल पाटील, आप्पा धडस, तानाजी शिंदे, शांतीलाल जाधव, तुषार पारेकर, अनिल गुटाळ, अमोल कुलकर्णी आदींनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.




