-->
करमाळाविशेष

रावगाव येथील दरेकर व शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

रावगाव (ता. करमाळा) येथील मनीषा दरेकर व संगीता शिंदे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणारा सन २०२५-२६ चा ग्रामपंचायत स्तरावरील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

 

हा पुरस्कार समारंभ रावगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी पार पडला. यावेळी रावगावच्या सरपंच सौ. रोहिणी शेळके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन दोघींचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी उपसरपंच भाऊसाहेब करगळ, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जाधव, छाया पवार, सुवर्णा फुंदे, मीराबाई बरडे, प्रियंका कांबळे, ग्रामसेविका स्वाती जाधव- माने, मेजर अशोक शिंदे, माजी पीएसआय शहाजी ओहोळ, माजी पीएसआय हनुमंत केकान, उद्योजक अशोकरावजी मुथ्था, जवाहर मुथ्था, डॉ. मुथ्था, माजी पं.स. सदस्य विलास मुळे, जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटोळे, पंडित नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर, राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्कर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीषा दरेकर व संगीता शिंदे यांच्या या सन्मानामुळे ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close