-->
करमाळाराजकिय

तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर ; आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावपुढारी लागले तयारीला

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील चौदा ग्रामपंचातीच्या सदस्यांपैकी काही जागा सदस्याचे निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द अथवा इतर अन्य कारणामुळे रिक्त जागा झाल्या असतील अशा ग्रामपंचातीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील १४ गावातील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. दरम्यान जिल्हापरिषद व पंचायत समिती निवणुकां तोंडावर असताना होणाऱ्या या पोटनिवडणूका रंगतदार होणार असल्याचे चित्र असून कार्यकर्त्यांमध्ये व गटामध्ये उत्साहाचे वातावरण तयार करण्यासाठी तालुका पातळीवरील नेत्यांकडून कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार आहे. या पोटनिवडणुकीकडे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. तसेच गावातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गावपुढारी देखील जोमाला लागणार आहेत.

३० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ०७ डिसेंबर २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ०९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ०३:०० पर्यंत असणार असून त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहेत. त्यानंतर मतदान हे २१ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० अशी असेल २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.

या चौदा गावात होणार पोटनिवडणूक
करमाळा तालुक्यातील अंजनडोह, देलवडी, हिवरे, हिंगणी, खडकी, लव्हे, रोशेवाडी, टाकळी, तरटगाव, उंदरगाव, वरकटणे, वशिंबे, केतुर पांगरे या गावातील रिक्त झालेल्या जागांवर ही निवडणूक होणार आहे.

दरम्यान तहसीलदार समीर माने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close