-->
करमाळा

उत्तरेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी; भाविकांनी केली मोठी गर्दी

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्ती भावात साजरी करण्यात आली. कार्तिकी एकादशी पासून तुळशी विवाहाला सुरूवात होऊन कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो. याच दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या देशातील सर्वात मोठ्या दिवाळी या सणाची सांगता होते.

 

 

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमेचे दिवसी भगवान शंकरानी त्रिपुरा सूर नावाच्या असुरांचा वध कला होता. अशी अख्यायिका सांगितली जाते. म्हणून, हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून आज मंदिरामध्ये दिपोत्सव साजरा करण्यात आला. या निमीत्त मंदिरात दिव्यांची रोषणाई केली होती. संपूर्ण मंदिरात व बारवे भोवती दिवे लावण्यात आले होते.

 

यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी पुजारी गणेश गुरव, बाळासाहेब गुरव, भैरू शिंदे, ऊत्तरेश्वर टोणपे, दत्ता कुलकर्णी, अमोल गलांडे, माऊली तळेकर, चंद्र कांत तळेकर, गणेश नवले, दिपक भिताडे, किरण तळेकर, दिलीप पवार, हनुमंत राऊत, सखाराम घाडगे, ऊत्तरेश्वर दगडफोडे, निलेश धर्मराज, दत्ता देवकर, केदार राहुल, आबा कोरे, पळसकर आदिनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close