
केम प्रतिनिधी/संजय जाधव


आदमापूर येथील श्री संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे मेंढरासहित अष्टविनायक गड रेल्वे गेट मलवडी ता. करमाळा येथे भाविकांनी हालगीच्या आवाजात व फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत केले. ह.भ.प. गुरूवर्य योगिराज रणजित महाराज आरणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. संतोष महाराज यांनी या पालखी सोहळ्याचे नियोजन केले.
या पालखी सोहळ्यासाठी मलवडी, निंभोरे, पांगरे, वडशिवणे भाळवणी, सांगवी, केम, जेऊर येथील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तरूण मंडळ, ग्रामस्थ व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. या पालखी सोहळ्याचा मुक्काम पाच दिवस गडावर होता. हा संपूर्ण परिसर बाळूमामा नामाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात नित्यनेमाने सकाळी ०९:०० ते ०९:३० या वेळेत बाळूमामा ची आरती व इतर धार्मिक कार्यक्रम होत असे. तसेच आरती झाल्यावर रांगेत भाविक दर्शन घेत होते. त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या पालखी सोहळ्यात ह.भ.प. लक्ष्मण महाराज आरणगाव, ह.भ.प. बळिराम महाराज वायकर, ह.भ.प. भिसे महाराज मलठण, ह.भ.प. आणासो गुरव महाराज मलवडी, ह.भ.प. निखील निंबाळकर महाराज बिटरगाव यांची कीर्तने झाली. या सोहळ्यात दररोज जेवणाच्या पंगती ऊठत होत्या.
यावेळी भाळवणी येथील अन्नदाते शिवाजी पोपट शिंदे, अभिमान दादा कोपनर, नाना सुखदेव शिंदे, बळिराम शिवलिंग पाडुळे, जगन्नाथ संपत सलगर, रायचंद आगतराव कोपणर, धनंजय मुगाजी कोपणर, शहाजी सोमा कोपणर हे तर मलवडी येथील अन्नदाते कोंडलकर, पालवे, सलगर, हांडाळ, भोसले, सुरवसे, बादल, हारदाडे, लवळे, दुरगुळे, कोळी, जाधव, कोकरे, देडगे हनवते यांनी अन्नदान केले.
या पालखी सोहळ्यासाठी श्री रामेश्वर, अष्टविनायक गड, पंचक्रोशीतील सर्व युवा तरूण मंडळ व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. यानंतर पालखीने जेऊर कडे प्रस्थान केले.




