
माय मराठी न्युज नेटवर्क


शिवजयंतीचे औचित्य साधत मुखई येथे लहान- थोर सर्वांनी मोठ्या उत्साहात ग्रंथ दिंडीचे आयोजन करून शिवरायांना मानवंदना दिली.
“हे स्वराज्य सुराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा आहे”
समाजातील विषमता दूर होवून वाचनाची आवड निर्माण व्हावी, कोविड मधील लॅाकडाउन ला कंटाळलेला समाज वाचनाने नवचेतनाच्या प्रवाहात यावा हा वाचन चळवळीचा मुख्य उद्देश ठेवून या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुखई गावच्या आदर्श सरपंच सौ. ज्योतीताई सचिननाना पलांडे, माजी ग्रा. पं. सदस्य सचिननाना पलांडे, माजी सरपंच अतुलशेठ धुमाळ, माजी सरपंच रमेशकाका पलांडे, माजी सरपंच पद्माताई पलांडे, ग्रा. पं. सदस्या सौ. संयोगिता पलांडे, मा. तानाजी पलांडे, तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब धुमाळ, आदर्श मुख्याद्यपक तावरे सर, युवा नेते पवन मदन, सामाजिक कार्यकर्ते विजय येवले, मा. बजरंग गोपाळे, युवा नेते सतीश न पलांडे, प्राथमिक शाळा मुख्याद्यापक श्री. गायकवाड सर व शिक्षक वृंद, संतकृपा वाचनालयाचे संस्थापक मा. सोमनाथ गजरे, अखिल शिवजयंती आयोजक कमिटी, सामाजिक कार्यकर्ते मा. शरद पलांडे, सामाजिक कार्यकर्ते बापू थोरवे, मा. नितीन थोरवे तसेच सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संखेने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संतकृपा वाचनालयास १ अर्थ सोशल फांउडेशन च्या माध्यमातून सौ. वैजयंता महेश गजरे व श्री. महेश गजरे यांनी वाचनालयास पुस्तके उपलब्ध करून दिली.
चिमुकल्या बाल मावळ्यांनी काढलेली ग्रंथ दिंडी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरवले. अशा प्रकारे मुखई गावाने शिवजयंतीचा सण साजरा करून आदर्श निर्माण केला.



