
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात साजरी होत आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम राबवून आपल्या राजाला अभिवादन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर येथे अतिशय उत्सवामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिव छत्रपती प्रतिष्ठान, दिलमेश्वर व गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. गिर्यारोहक स्वप्नील मोरे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करण्यात आला. या वेळी पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवून श्रींना मानवंदना दिली. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंडळाचे सदस्य संतोष गाडवे यांचे वडील महादेव गाढवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विक्रम मोरे, उपाध्यक्ष रंजीत बिरंगळ, खजिनदार वैभव मस्के, सचिव गजानन (महाराज) मिसाळ, सदस्य नीतीन मोरे, कृष्णा मस्के, आकाश पिसाळ, ऋषिकेश मस्के, माऊली मोरे, विनोद मारकड, ओम मारकड, चेअरमन जीवन पिसाळ, सचिन मोरे, सोमनाथ मल्लाव, हुसेन पठाण सर, प्रकाश राक्षे, मेहुल राक्षे, शिवाजी मल्लाव तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते.




