स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश; एफआरपी न दिल्याने तालुक्यातील ‘या’ कारखान्यांवर कारवाई
करमाळा प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. करमाळा तालुक्यातील तीनही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपीप्रमाणे रक्कम दिलेली नव्हती. शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलना नंतर करमाळा येथील कमलाई साखर कारखान्यावर आर. आर. सी कारवाई करून तहसील साहेबांनी शेतकऱ्यांना टप्याटप्याने पैसे देऊन एफआरपीची रक्कम पुर्ण केली आहे. तसेच मकाई सहकारी साखर कारखान्यानेही राहीलेल्या शेतकऱ्यांचे २२००/- रूपये प्रति टन प्रमाने उस बील जमा केले आहे. तरी तालुक्यातील तीनही साखर कारखान्याने सात महिन्यानंतर का होईना पण शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपी प्रमाणे रक्कम दिलेली आहे. परंतु, यापुढे शेतकऱ्यांना ऊस बिल देण्यास कारखान्यांनी एवढा वेळ लावु नये. अन्यथा जिथे अन्याय होतो तिथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असते. त्यामुळे, शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये कारण, शेतकरी हा पैशाने श्रीमंत नसतो. त्यांच्या समोर अनेक अडचणी असतात. त्याचा फायदा कारखान्यांनी घेऊ नये. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तसेच शेतकऱ्यांची ऊस बिले उशीरा का होईना पण दिली म्हणुन, कारखाना व तहसील कार्यालय यांचे आभार मानले.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवी आण्णा गोडगे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक शिंदे, करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, ता. युवा अध्यक्ष अमोल घुमरे, ता. पक्षाध्यक्ष बापू फरतडे, ता. उपाध्यक्ष तानाजी शिंदे, ता. युवाउपाध्यक्ष बापू वाडेकर, स्वाभिमानी नेते प्रमोदजी वारे, जातेगाव शाखाध्यक्ष अशोक लवंगारे, रावगावचे नेते बलभिम धगाटे सर, सौदे गावचे मा. सरपंच पांडुरंग साळुंखे, रावगावचे जोतीराम धगाटे आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.



