-->
करमाळा

“नाचून नाही तर वाचून”… मांगीत बाबासाहेबांची जयंती आदर्श पद्धतीने साजरी

 

प्रतिनिधी / करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती “नाचून नाही, तर वाचून” या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद घेत जन्मोत्सव साजरा केला.

 

१४ एप्रिल रोजी सकाळी पंचशील बुद्ध विहार परिसरात सडा-रांगोळी काढून जेष्ठ व युवा मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध पूजन व बुद्ध वंदना घेण्यात आली. यावर्षी मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देत बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. भाजप नेत्या रश्मीदीदी बागल कोलते यांनी स्वखर्चातून विहाराच्या रंगरंगोटी साठी धम्मदान दिले.

 

या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, सरपंच सोनाली गायकवाड, उपसरपंच नवनाथ बागल, ग्रामसेवक इंगळे, पोलीस पाटील आकाश शिंदे, अमित बागल, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, पप्पू शिंदे, बन्सी गायकवाड, संदीपान बागल, नितीन शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता अवचर, गोटू बागल, निलेश बागल, ॲड. विक्रम चौरे, आदेश बागल, रोहित शिंदे, ग्रामशिपाई संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील बुद्ध विहार कमिटीचे सदस्य प्रेम चव्हाण, शुभम अवचर, अजीनाथ अवचर, संतोष चव्हाण, शहाजी अवचर, अजय अवचर, राजकुमार अवचर, सुशांत चव्हाण, रोहित शिंदे, गुरपत पवार, शाम पवार, प्रकाश अवचर, नवनाथ अवचर, राहुल अवचर, हर्षवर्धन अवचर, अंकुश अवचर, सागर अवचर, अभिमान अवचर, महादेव अवचर, अर्जुन अवचर तसेच मार्गदर्शक पत्रकार प्रवीण अवचर यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी मांगी गावातील नागरिकांसह घूमट वस्ती व राजवाडा परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या आदर्श जयंती उपक्रमाबद्दल सुजित तात्या बागल यांनी आपल्या भाषणात कमिटीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मांगी गावातील या उपक्रमाचे करमाळा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close