-->
करमाळाराजकिय

भाजपा संपर्क कार्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी साजरी

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय करमाळा येथे आज दि.१६ ऑगस्ट २०२१ रोजी दिवंगत पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी मा. तालुकाध्यक्ष गणेशजी चिवटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी विस्तारक ॲड. भगवान गिरीगोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी अटलजींच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला व भाजपाचा वटवृक्ष बनवून देण्यामध्ये असलेला अटलजींचा त्याग व समर्पण सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितला. त्यांनंतर ज्येष्ठ नेते मा. विठ्ठलराव भणगे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी अटलजींच्या असामान्य नेतृत्वा विषयीची माहिती कार्यकर्त्यांसमोर उलगडून सांगितली.

समारोपप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी कार्यकर्त्यांना अटलजींनी जीवनात केलेला संघर्ष व त्याग कशा स्वरूपाचा होता हे विशद केले. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले तर निश्चितच भाजपाचे कमळ करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुलल्या शिवाय राहणार नाही व हाच संकल्प घेवून या ठिकाणाहून आपण जावे व कामाला लागावे असे सांगितले.

सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब कुंभार, प्रदीप देवी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय नागवडे, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र हाके, प्रवीण बिनवडे, सतीश फंड, भटके-विमुक्त आघाडीचे लखन चिरके, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष शिवशंकर मोहोळकर, सतीश घरबुडवे, सुभाष कदम, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष कमलेश दळवी, कोषाध्यक्ष तेजश बोकन, शरद कोकीळ, संदीप गावडे, पत्रकार मस्कर, गणेश गोसावी, वसीम सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close