करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) येथे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सिनेअभिनेते मा. श्री. सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून “झाडांचे शतक” या उपक्रमामध्ये भाग घेऊन आज देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार कोरोना आचारसंहिता असल्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र न येता टीम पाणी फाउंडेशन व ग्रामपंचायत शेलगाव (क) येथिल ग्रामस्थांनी गाव ओढ्यावर बांबू व इतर काही देशी जंगली झाडे लावून स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली.
चांगल्या प्रतीची बांबू व काही देशी जंगली झाडे वन विभागाकडून आणली होती. यावेळी सरपंच श्री. अशोक मधुसूदन काटुळे, गावातील टीम पाणी फौंडेशन चे सदस्य श्री. बाळासाहेब (सचिन) वीर, डॉ. श्री. विकास वीर सर, श्री. बापू माने, श्री. वैभव वीर, डॉ. श्री. नागनाथ माने सर, श्री. लखन ढावरे (ग्रा.सदस्य), श्री. संतोष मोहिते, श्री. बापू माने, श्री. अमोल शिंदे इतर तरूणवर्ग, ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी या उपक्रमात सहभागी होऊन सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत वृक्ष लागवड केली. यावेळी पाणी फाऊंडेशनचे करमाळा तालुका समन्वयक श्री. प्रतीक गुरव साहेब उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल तसेच सर्व ग्रामस्थांनी हा कार्यक्रम राबविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गावचे ग्रामसेवक श्री. महेश काळे यांनी सर्वांचे आभार मानले.



