-->
करमाळा

मोठ्या भावाला वाचविण्यासाठी लहान भावाची पाण्यात उडी; दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू

माय मराठी न्युज

पाण्याच्या प्रवाहात उतरून सेल्फी काढण्याच्या नादात दोन सख्खे भाऊ घसरून पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरण क्षेत्रांमधील पावर हाऊस मध्ये घडली आहे. या दोघांचेही मृतदेह मिळाले नसून पवनी पोलिसांद्वारे शोधकार्य सुरु आहे.

मंगेश मधुकर जुनघरे (वय ३७ वर्षे) व विनोद मधुकर जुनघरे (वय ३५ वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन सख्या भावंडांची नावे आहेत. हे दोघे नागपूर जिल्ह्यातील उमरेड या गावचे रहिवासी असून ते स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या ईतर मित्रांसोबत भंडारा जिल्ह्यामधील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरण क्षेत्रात फिरायला आले होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

गोसेखुर्द धरणावर मंगेश जुनघरे हा धरणाच्या काठावर सेल्फी काढत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यामध्ये पडला. आपला भाऊ पाण्यामध्ये पडला आहे हे पाहताच त्याचा धाकटा भाऊ विनोद जुनघरे याने त्याला वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता पाण्यामध्ये उडी घेतली. मात्र, या दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

पवनी पोलीस प्रशासनाने स्थानिक मच्छिमारांना बोलावून त्यांचे मृतदेह शोधत आहेत. मात्र, अजूनही त्यांचे मृतदेह मिळाले नसून पोलिसांचे शोधकार्य सुरूच आहे. एकाच घरातील दोन सख्या भावंडाचा एकाच वेळी असा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने उमरेड गावावर शोककळा पसरली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close