-->
महिलाविषयकराजकिय

डिंग्रजवाडीच्या उपसरपंच पदी संगीता गव्हाणे यांची बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

डिंग्रजवाडी, ता. शिरूर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच संगीता शिवाजी गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रिया कांतीलाल गव्हाणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश आबासाहेब गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी संगीता गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने ग्रामसेवक सदानंद फडतरे यांनी संगीता शिवाजी गव्हाणे यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे जाहीर केले.

 

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर गव्हाणे, दीपाली गव्हाणे, प्रसाद गव्हाणे, शोभा गव्हाणे, माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, राहुल गव्हाणे, माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, माजी चेअरमन राजाभाऊ गव्हाणे, दादाभाऊ गव्हाणे, मधुकर गव्हाणे, आजी माजी पदाधिकारी व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. निवडीनंतर संगीता गव्हाणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close