-->
करमाळासामाजिक

करमाळा-कुर्डुवाडी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा; बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा ते कुर्डूवाडी या रस्त्याचे काम करणाऱ्या एम पी कंट्रक्शन या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे करमाळा तालुका उपाध्यक्ष अनिल तेली यांनी केली आहे. करमाळा ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम सुरू होऊन दीड वर्षे होऊन गेले तरीही काम पूर्ण केलेले नाही. नुसते रस्ते खोदून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 

 

सध्या साखर कारखाने सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाचे ट्रॅक्टर ऊस वाहतूक करताहेत. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे उसाचे ट्रॅक्टर पलटी होऊन पूर्ण रस्ता बंद होत आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या कित्येक लोकांना आपले हातपाय गमवावे लागलेले आहेत तर काही प्रवाशांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन एन पी कन्ट्रक्शन चे मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सदर कंपनीला आदेश काढावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी अनिल तेली यांनी केली आहे.

 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते भागवत दुधे, तुकाराम शिरसागर, उमराव दुधे, समत मुजावर, मधुकर भोसले, सामाजिक कार्यकर्ते युनूस भाई मुजावर, सुनील मुजावर आदीजण उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close