-->
राजकियराज्य

श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ

तिन्ही गावांतील सर्वच गट एकत्र आल्याने निवडणुकी मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक .. ?

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा नंबर २ विविध विकास कार्यकारी सोसायटी ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरेगाव भीमा नंबर २ सोसायटी मध्ये एकूण १२७६ सभासद (मतदार) असून यात १३ संचालक आहेत. १३ जागांमधील ३ जागा बिनविरोध झाल्याने १० जागांसाठी रविवार दिनांक ६ मार्च रोजी श्री भैरवनाथ सहकार पॅनल ने पायी रॅली काढत प्रचाराचा शुभारंभ केला.

 

 

कोरेगाव भिमा चे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात, वाडा गावचे ग्रामदैवत धर्मनाथ महाराजांच्या मंदिरात तर डिंग्रजवाडी चे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात श्री भैरवनाथ सहकार पॅनलच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, अशोक काशीद, माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे, राजाराम ढेरंगे, अरविंद गव्हाणे, दत्तात्रय ढेरंगे, गणेश गव्हाणे, नारायण फडतरे, विक्रम गव्हाणे, सोपान गव्हाणे, केशव फडतरे, कैलास सोनवणे, दिनकर गव्हाणे, माजी चेअरमन सर्जेराव गव्हाणे, रमेश गव्हाणे, रोहिदास गव्हाणे, अशोक गव्हाणे तसेच कोरेगाव भीमा, वाडागाव व डिंग्रजवाडी मधील असंख्य पदाधिकारी, ग्रामस्थ व मतदार उपस्थित होते.

 

 

कोरेगाव भीमा नंबर २ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२ ते २०२७ व्यवस्थापन समितीसाठी महिला प्रतिनिधी मधून सारिका संभाजी गव्हाणे व विमल ज्ञानेश्वर शिंदे तसेच भटक्या विमुक्त जाती / जमाती प्रतिनिधी मधून संतोष बाळू माकर यांची आधीच बिनविरोध निवड झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच जागा बिनविरोध होण्याची आशा असताना अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी वेळेच्या अभावामुळे काही उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची इच्छा असताना देखील अर्ज माघारी घेता न आल्याने राहिलेल्या १० जागांसाठी निवडणूक लागली. १० जागांसाठी लागलेल्या निवडणुकीसाठी श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनलच्या वतीने सर्वसाधारण खातेदार प्रतिनिधी मधून अशोक दत्तात्रय गव्हाणे, अनिल एकनाथ गव्हाणे, अशोक देवचंद नाबगे, नागनाथ जगन्नाथ गव्हाणे, प्रवीण बाबूराव गव्हाणे, बबुशा आनंदराव ढेरंगे, पंडित केशव फडतरे, महादेव सोपान फडतरे यांना, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनीधी मधून रामदास गुलाब कांबळे तर इतर मागावर्गीय प्रतिनीधी मधून बाळासाहेब दत्तात्रय वाडेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनल च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पॅनल च्या वतीने तीनही गावच्या ग्रामदैवतांना नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. कोरेगाव भिमा नंबर २ विविध विकास कार्यकारी सोसायटी ही तीन गावांची सहकार संस्था आहे. यावेळी श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनल च्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांचा सत्कार ग्रामस्थ व मतदारांच्या वतीने करण्यात आला.

 

 

कोरेगाव भिमा हे तालुक्यातील मोठे गाव असून देखील याचा राजकीय फायदा कोरेगाव ला घेता आला नाही. आपला उमेदवार जिल्हा व पंचायत समिती मध्ये पाठवण्यासाठी ही निवडणूक भविष्यातील राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या गावच्या उमेदवारांना तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात एकीने पाठवण्याची ही सुवर्णसंधी आहे असे प्रतिपादन यावेळी माजी सरपंच आबासाहेब लक्ष्मण गव्हाणे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close