
माय मराठी न्यूज नेटवर्क


कामोने (ता. करमाळा) तलावात पाणी आणण्याची धमक केवळ नारायण (आबा) पाटील यांच्यातच असून लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभेची ही निवडणूक शेतकऱ्यांनी हातात घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सत्ता परिवर्तनास तयार राहावे. असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी केले. माजी आमदार नारायण पाटील यांच्या जनसंवाद गावाभेट दौऱ्यात कामोने येथील कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना देवानंद बागल म्हणाले की, रावगाव गट आणि मांगी परिसरातील जनता आता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये केलेली कामे जनता विसरलेली नाही. यामुळे आता विकास काळ परत एकदा यावा म्हणून सन २०२४ ची विधानसभा निवडणूक जनता हातात घेणार आहे. नारायण आबा पाटील यांना आमदार करण्यासाठी रावगाव गट आघाडी वर असेल. कामोने, बिटरगाव श्री, पुनवर, आळजापूर, वडगाव, खडकी आदी गावातील शेतकरी शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची अपेक्षा माजी आमदार नारायण आबा यांचे समोर बोलून दाखवत आहेत. त्यामुळे भविष्यात या भागाला कायमस्वरूपी बागायती बनविण्यासाठी आता सत्तेत बदल निश्चित होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार नारायण पाटील, पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या बैठकीसाठी पंकज नलवडे, अरुण काळे, सुहास जाधव, बाळू शिंदे, चिंटू भालेराव, विकास कांबळे, औदुंबर नलवडे, सचिन नलवडे, अतुल नलवडे, बिभीषण देमुंडे, दत्तात्रय खरात, मारुती भिसे, नारायण शिंदे, अशोक चोरगे, बाळासाहेब देवकाते, सुदाम नलवडे, विठ्ठल भिसे, प्रशांत शिंदे, पोपट पवार, प्रकाश खराडे यांचेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




