
करमाळा/प्रतिनिधी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून त्यासाठी करमाळ्यातून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यावा. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अर्ज भरणे प्रारंभ व बांधकाम कामगार महिलांना भांडी वाटप करणे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती सुनीलशेठ चोरडिया, शिवसेना मुस्लिम आघाडी बीड जिल्हा समन्वयक सय्यद मन्सूर पटेल, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, उपतालुकाप्रमुख सुनीता गोडगे, जेऊर शहरप्रमुख माधव सूर्यवंशी, युवासेना शहरप्रमुख जेऊर बाळासाहेब करचे, तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, शाखाप्रमुख बाबासाहेब तोरणे, संजय जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील गटातटाचे पुढारी केवळ ठेकेदार व आपल्या बगलबच्चांच्या हिताचे राजकारण करतात. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते सोडवणार नाहीत आणि त्यांना वेळ पण नाही. खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रश्नाला धावून शिवसेना जाते. वैद्यकीय मदती पासून शासकीय योजनेचा फायदा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शिवसेना पोचून देते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातील स्वार्थी लबाड पुढार्यांना ओळखा असे आव्हान केले.
करमाळा तालुक्यात ८५०० बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याची टार्गेट असून ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असून त्याचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. यावेळी महेश चिवटे यांनी गटा तटाच्या राजकारणावर कडाडून टीका केली. वाळू, व्याज भट्टाच्या माध्यमातून राजकारण करणारे व शेतकऱ्याचे साखर कारखाने बुडून राजकारण करणाऱ्यांना जनता कंटाळली आहे. आत्ता लोकांना विकासाचे राजकारण पाहिजे. विकासाचे राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करू शकतात. यामुळे एकनाथ शिंदे यांचे विचाराचा आमदार करमाळ्यातून विधानसभेत जाणार आहे. शिवसेनेने उमेदवारी दिली तर विधानसभा लढवणार असा दावा या कार्यक्रमात महेश चिवटे यांनी केला.
गेल्या ४० वर्षात करमाळातील उर्दू शाळेला वर्ग वाढीची मान्यता मिळाली नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही धर्मभेद जातीभेद न करता करमाळातील उर्दू शाळेला वर्ग वाढ देऊन मान्यता दिली. खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला न्याय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतात. असा आमचा विश्वास असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण मुस्लिम समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
मन्सूर सय्यद पटेल
शिवसेना मुस्लिम आघाडी, जिल्हा समन्वयक, बीड



