करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेलगाव – वांगी येथे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १७१ वह्यांचे वाटप करून साजरा
करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला – मुलींना १७१ वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक जगताप सर यांनी केले तर मयूर खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवा समर्पण अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रमा निमित्त विद्यार्थ्याना मार्गदर्शनपर बोलताना दत्तात्रय पोटे म्हणाले की, एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतात. मोदी साहेब आज संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे नेतृत्व करू लागले आहेत. अमेरिकेसारख्या विकसित देशाला मागे टाकून आपल्या देशाला जगात महत्त्वाचं स्थान हे फक्त मोदी साहेबच मिळवून देऊ शकतात. मोदी प्रमाणे जिद्द, चिकाटी आणि अभ्यास करून मुलांनी मोदी साहेबांचा आदर्श ठेवून प्रगती करावी असे मार्गदर्शन मुलांना केले.
यावेळी शेलगाव वांगी मधील ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आदिनाथ कारखाना संचालक दिलीप केकान, सोमनाथ पोटे, संतोष केकान, अभिजीत केकान, बाळासाहेब काळे पाटील, मुन्ना खाडे, बाळासाहेब पोटे, शेखर पोटे, संदीप केकान, देविदास साळुंखे, यशवंत सुतार, देविदास पोटे, मंगेश घोडके, रवी बेरे, राजेंद्र राऊत, गणेश केकान आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी काळेल गुरूजी यांनी आभार प्रदर्शन केले.



