-->
करमाळा

शेलगाव क येथील तन्मय काटुळे कर सहाय्यक परीक्षेत राज्यात प्रथम 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

शेलगाव क (ता. करमाळा) येथील चि. तन्मय तानाजी काटुळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहाय्यक (टॅक्स असिस्टंट) परीक्षेत ३०२ गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

 

       तन्मय काटुळे याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण करमाळा येथील नगरपरिषद शाळेत, पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे कर्जत येथील श्री अमरनाथ विद्यालयात तर अकरावी व बारावीचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय झाले. त्यानंतर त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राहुरी येथे एग्रीकल्चरल इंजीनियरिंग (Agril.Engg) ही पदवी प्राप्त केली.

 

          या यशामध्ये आई, वडील यांच्यासह मित्र परिवार व नातेवाईक यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे तन्मय याने शेवटी बोलताना सांगितले. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close