-->
करमाळाक्रीडा

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त केत्तुर येथे भव्य निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा तालुक्यातील केत्तुर नं. २ येथे सोमवार दि. १५ मे २०२३ रोजी भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार दि. १४ मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजता धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या नियोजित कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. मुन्ना झुंजुर्के (उप महा. केसरी, शिवराम दादा तालीम, पुणे) विरुद्ध पै. समाधान पाटील (उप महा. केसरी, जय हनुमान तालीम नजिक पिंपरी) यांच्यामध्ये होणार असून या कुस्ती करिता इनाम रक्कम १,५१,०००/- रूपये आहे. तसेच द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. सुहास गोडगे विरुद्ध पै. संतोष जगताप यांच्यामध्ये होणार असून या कुस्ती करिता इनाम रक्कम १,२१,०००/- रूपये आहे. तर तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. प्रशांत जगताप विरुद्ध पै. सतपाल सोनटक्के यांच्यात होणार आहे. या कुस्तीसाठी इनाम रक्कम १,११,०००/- रूपये आहे. ठरविलेल्या कुस्त्या व्यतिरिक्त लहान गटातील तसेच इनाम रक्कम ३०००/- रुपये पर्यंतच्या कुस्त्या सकाळी ११ ते २ या वेळेत नेमण्यात येणार आहेत.

 

या जंगी कुस्ती मैदानाचे उद्घाटन करमाळा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. तरी करमाळा तालुका व केत्तूर परिसरातील कुस्ती शौकिनांनी या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा. असे आवाहन संयोजकाच्या वतीने उदय खाटमोडे-पाटील यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close