
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


वेगवेगळे उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असलेल्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीने अजून एक अनोखा उपक्रम राबविला आहे. गावातील सर्व घरासमोर स्वतः घर मालकांचे नाव व घर क्रमांक लिहीलेले फलक लावण्यात आले आहेत.
या अगोदरही उंदरगाव ग्रामपंचायतीकडून गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये नियमित ग्रामपंचायतचा कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा, जनावरांसाठी लसीकरण, दिव्यांगांना मोफत ब्लॅंकेट वाटप, गावातील प्रत्येक कुटुंबाच्या नावे पाच झाडांची रोपे लावणे, वृक्षारोपण व गावात ५० % कुटुंबाकडे बायोगॅस आहे तसेच दर रविवारी गावाच्या स्वच्छतेसाठी दोन तास श्रमदान असे वेगवेगळे उपक्रम उंदरगाव ग्रामपंचायत च्या वतीने राबविले आहेत.
उंदरगाव ग्रामपंचायत कडून राबविण्यात येणाऱ्या या वेगवेगळ्या उपक्रमाचे व ग्रामपंचायतच्या कार्याचे परिसरातील नागरिकांमधून सर्वत्र कौतुक होत आहे.
उंदरगाव ग्रामपंचायतीची आदर्श ग्रामपंचायत कडे वाटचाल…
आमच्या गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायतीला मोलाचे सहकार्य करीत आहेत. आमच्या उंदरगाव ग्रामपंचायत ची आदर्श ग्रामपंचायत कडे वाटचाल चालू आहे.युवराज मगर, सरपंच, उंदरगाव ग्रामपंचायत.



