-->
करमाळाविशेष

करमाळा भुईकोट किल्ला संवर्धनाचे काम जोमाने सुरू; मा.आ. संजयमामांनी उपलब्ध करून दिला होता २ कोटींचा निधी

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येत असून या कामासाठी २ कोटी निधी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळामधून मिळविला होता. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला याची बांधणी राजे जानोजी, रंभाजी (रावरंभा) निंबाळकर यांनी सतराव्या शतकात केली.

 

सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारची बांधकामे ऑगस्ट २०२४ पासून सुरू आहेत.

 

करमाळा शहराचा हा ऐतिहासिक वारसा जतन होण्यासाठी या संपूर्ण किल्ल्याची डागडुजी होण्यासाठी आणखी करोडो रुपयांची गरज असून तो निधी संजयमामा शिंदे यांनी त्यांची राजकीय ताकद वापरून राज्य सरकारकडून उपलब्ध करून द्यावा. अशी शहरातील जाणकार, इतिहास प्रेमी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close