-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

आदिनाथ कारखाना निवडणुकीसाठी गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू असताना आज सोमवार दि. १७ मार्च रोजी शेवटच्या दिवशी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

 

या प्रसंगी बोलताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही सर्व ताकदीनिशी लढणार आहोत. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुस्थितीत आणू असे मत गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, सोमनाथ घाडगे, अमोल पवार, किरण बागल, दादासाहेब सरडे, दादासाहेब देवकर, लक्ष्मण शेंडगे, सचिन गायकवाड, जयंत काळे पाटील, किरण शिंदे, गणेश गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close