-->
आरोग्यकरमाळाराजकियसामाजिक

शिवजयंती निमित्त हिवरे येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा हिवरे (ता. करमाळा) यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून शिवजंयती उत्सव साजरा केला जातो. या वर्षी देखील युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवल्याची माहिती युवासेना शाखा हिवरे यांच्या वतीने देण्यात आली आहे. 

 

यामध्ये दि. १७ मार्च रोजी सकाळी ९ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विधिवत पुजा करून प्राण-प्रतिष्ठापणा होणार आहे व वाढत्या उन्हा पासून सरंक्षण होण्यासाठी जिल्हापरिषद शाळेतील सर्व विद्यार्थांना टोप्यांचे वाटप केले जाणार आहे. दि. १८ मार्च रोजी महमंदवाडी पुणे हडपसर येथील सुप्रसिद्ध एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोफत लेन्स सह मोफत ऑपरेशन केले जाणार आहे, मांस काढण्यासाठी नाममात्र २५०० रू फि आकारण्यात येणार आहे, या साठी प्रवास खर्च, जेवण पुर्ण पणे मोफत असून रुग्णांनी आधार कार्ड रेशनकार्ड व मोबाइल नंबर सोबत ठेवावा तसेच नाव नोंदणी साठी ८६०००६४५४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

अपघात तसेच महिलांच्या प्रसूती दरम्यान वाढत्या रक्ताची गरज पाहता दि. १९ मार्च रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन युवासेना शाखा हिवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम हिवरे येथील बस स्टॅन्ड समोर असलेल्या स्व. लोचनबाई फरतडे सांस्कृतिक भवन येथे होणार आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close