-->
करमाळाराजकिय

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विभागीय आयुक्तांकडून स्थगिती; निमगावचे लखन जगताप यांचे सरपंच पद कायम

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) चे सरपंच लखन जगताप यांना मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे दि. १० डिसेंबर २०२४ रोजी अपात्र ठरविले होते. त्यांच्या या निर्णयाविरोधात लखन जगताप यांनी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले असता अतिरिक्त विभागीय आयुक्त श्रीम. कविता द्विवेदी यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्णयाला स्थगिती देऊन लखन जगताप यांना पात्र ठरवून त्यांचे सरपंच पद कायम ठेवले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी निमगाव ह, (ता. करमाळा) चे सरपंच लखन अरुण जगताप यांचे सरपंच पद मकाई सह. साखर कारखान्याचे संचालक सतीश मधुकर निळ यांच्या तक्रारीवरून सरपंच जगताप यांनी आपल्या पदाचा गैरवापर तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांच्याकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक १०५/२०२१ अन्वये दि. १०/१२/२०२४ रोजी त्यांना अपात्र ठरविले होते. त्या आदेशावर नाराज होऊन जगताप यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे रितसर अपील दाखल केले होते. त्यावर दि. ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी घेऊन आज दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल दिला आहे. यामध्ये जगताप यांचे अपील मान्य करून मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी विवाद अर्ज क्र. १०५/२०२१ मध्ये दि. १०/१२/२०२४ रोजी दिलेला आदेश रद्द केला आहे.

 


जगताप व निळ यांचा युक्तिवाद तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे निकालपत्र यावरून अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी नोंदविलेला निष्कर्ष 

कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवता येणार नाही. लोकशाही मार्गाने निवडुन आलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला अपात्र करणेसाठी तो सदस्य शासकीय/सार्वजनिक मिळकतीवरील अतिक्रमित मिळकतीचा उपभोग घेत असल्याचे निर्विवादपणे, कागदोपत्री ठोस पुराव्यानिशी सिध्द होणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणामधील वस्तुस्थिती व दाखल पुरावे पाहता, अपीलार्थी/कुटुंबिय यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले असल्याचे कोणतेही शासकीय अभिलेखे किंवा ठोस पुरावे दाखल नाही. त्यामुळे जगताप यांचेकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम १४ (१) (ज-३) चे उल्लंघन झाले असल्याचे निर्विवादपणे स्पष्ट सिध्द होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे दि. १०/१२/२०२४ रोजीच्या आदेशामध्ये बदल करणे आवश्यक असल्यामुळे तो करण्यात आला आहे.


 

यापूर्वीही माझे सरपंच पद घालवण्यासाठी अनेक खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु विरोधकांना अजूनही त्यामध्ये यश मिळाले नाही. यापुढेही माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी निमगावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

मा. लखन जगताप, सरपंच, निमगाव (ह)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close