-->
करमाळा

एसटी बसचा रावगाव जवळ अपघात; जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

कर्जत येथून करमाळ्याच्या दिशेने निघालेल्या करमाळा आगाराच्या एसटी बसचा (एम एच-१३ सी यू ७८८३) अपघात रावगाव (ता. करमाळा) येथील बुधवंत वस्तीजवळ आल्यावर झाला आहे. बसच्या स्टेअरिंग चा रॉड तुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार करमाळा आगाराची बस कर्जतहून करमाळ्याकडे ३५ ते ३८ प्रवाशी घेऊन जात असताना रावगाव जवळ लिंबेवाडी रस्त्याच्या वळणावर या बसचा अपघात झाला. ही बस रस्त्यावरून खाली उतरल्याने एका बाजूला पलटली. पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून रावगाव येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजा, खिडकीतून तसेच बसची काच फोडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून चालक, वाहक यांच्यासह जखमी प्रवाशांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी बसची प्रवासी संख्या वाढावी म्हणून अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. परंतु दिवसेंदिवस एसटी बसच्या अपघातात होणाऱ्या वाढीमुळे एसटी महामंडळाला प्रवासाच्या जीवाची काळजी आहे की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसेच एसटी बसच्या सतत होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांना वेळेवर नियोजित स्थळी पोहोचता येत नसल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

कर्जतहून आलेल्या एसटी बसचा अपघात झाल्याचे समजतात आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना आपत्कालीन खिडकीतून व एसटीची काच फोडून  सुखरूप बाहेर काढले. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.

आयुब शेख, प्रत्यक्षदर्शी, रावगाव.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close