-->
करमाळासामाजिक

७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त घारगाव ग्रामपंचायत व जि.प. शाळेत ध्वजारोहण संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

घारगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात सकाळी ०८:०० वाजता संपन्न झाला.

आज संपूर्ण देशभरात घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकावून आनंद व्यक्त होत आहे. ध्वजारोहण नंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
अमृत महोत्सवी दिनानिमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आले.

यावेळी सरपंच अनिता भोसले, उपसरपंच सतीश पवार, माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी सरवदे, आशा देशमुखे, कविता होगले, दत्तात्रय मस्तूद तसेच गावातील अनेक मान्यवर, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आदीजण उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close