
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लंम्पी या जनावरांच्या आजाराने थैमान घातले असल्याकारणाने माढा लोकसभा मतदासंघाचे खासदार मा. ना. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार करमाळा तहसील येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये करमाळा तालुक्यातील सध्या असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
करमाळा तालुक्यातील काही जनावरांमध्ये लंपि आजाराची लक्षणे आढळल्याने त्या जनावरांच्या रक्ताचे नमुने विभागीय रोग अन्वेषण निदान प्रयोग शाळा औंध – पुणे ६७ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तरी त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुधनांची काळजी घ्यावी. आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये व आजूबाजूस स्वच्छता ठेवावी. तसेच बाहेर तालुक्यातून पशुंची खरेदी करण्याचे टाळावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे.
या बैठकीसाठी तहसीलदार मा. समीर माने साहेब, गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण शिंदे, डॉक्टर कांबळे, भाजपाचे करमाळा तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, पांडे गावचे उपसरपंच नितीन निकम, विशाल साळुंखे, विनोद इंदलकर व ईतर पशुअधिकारी उपस्थित होते.



