-->
करमाळाविशेष

डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयात CET व NMMS परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

गौंडरे (ता. करमाळा) येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयात भोसले कोचिंग क्लासेसच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना (NMMS) व सामान्य प्रवेश परीक्षा (CET) या परीक्षेमधून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रा. रेवन भोसले सर यांचा सत्कार समारंभ शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी आदित्य नलबे, वैष्णवी झोडगे व रेणुका ननवरे या NMMS पात्र विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श गायकवाड, निलेश भोसले, वैष्णवी कुलकर्णी व मयूर निळ या CET पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रा. रेवण भोसले सर व सुयश कोचिंग क्लासेस कुर्डूवाडी चे व्यवहारे सर यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री. समाधान व्यवहारे सर यांनी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले व देवा चव्हाण यांनी अशक्य ते शक्य या विषयावर आपले विचार मांडले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. गोफणे सर यांनी केले. या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती, मान्यवर, पालक वर्ग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close