
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. ०४ ऑक्टोंबर २०२४ रोजी निंभोरे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये निंभोरे ते कोंढेज रस्ता (हॅम २७१ कोटी, निंभोरे ते घोटी रस्ता १ कोटी, स्मशानभूमी सुशोभीकरण ३ लाख, तलाठी कार्यलय १५ लाख, पाणंद रस्ता ५.५ लाख, यल्लमा देवी मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक व वॉल कंपाउंड ५.५० लाख, गवळी- जगताप- वाघमारे- वरकड- सावंत- मारकड- काशीद- सांगडे- वळेकर- शिंदे वस्ती कडे जाणारा कॅनॉल रस्ता, बंदिस्त गटार ६ लाख, स्वच्छ भारत मिशन १२ लाख, वॉटर फिल्टर ६ लाख, आंबेडकर नगर पाणीपुरवठा करणे ५ लाख, आंबेडकर नगर पेव्हिंग ब्लॉक ५ लाख, अण्णाभाऊ साठे नगर पाणीपुरवठा करणे १ लाख, जि. प. प्रा. शाळा निंभोरे दुरुस्ती साठी ३ लाख रुपये अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.
यावेळी चंद्रकांत सरडे, विलास दादा पाटील, राजेंद्र बारकुंड, सुजित बागल, गव्हाणे साहेब, सरपंच रवी वळेकर, अशोक बप्पा वळेकर, चेअरमन संतोष पाटील, उपसरपंच धनंजय वळेकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य समाधान वळेकर, दीपक गवळी, अरुण वळेकर, बप्पासाहेब, शहाजी काळदाते, पप्पू म्हस्के, दिनेश वळेकर, दत्ता वळेकर, अक्षय वळेकर, नाथा शिंदे, सोमा गुरव, गणेश वळेकर, अण्णा वळेकर, बिभीषण फरतडे, अमोल वळेकर, सुभान फरतडे, ज्योतीराम वळेकर, हभप अमोल काळदाते महाराज, बापू मोरे, बाळू सांगळे, अर्जुन काळदाते, दशरथ वळेकर, बापू वळेकर, दादा पठाण, राज पठाण, श्रीराम काळे, जालिंदर गवळी, प्रकाश खाडे, फंटु गवळी, धनंजय सांगडे, विक्रम मस्के, दिनेश फरतडे, संदीप दळवे, अतुल सांगळे, विकास सांगळे, राहुल फरतडे, धनंजय वाघमारे, अभिजीत वळेकर, शहाजी कोंडलकर, स्वप्निल पाडूले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य निंभोरे व आर.व्ही ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्राची राजेंद्र गवळी, राणी साधू सावंत, सागर नागनाथ वाघमारे व बालाजी आप्पा गवळी यांचा विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. अमोल काळदाते, विलास दादा पाटील, चंद्रकांत सरडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रवींद्र वळेकर यांनी केले. आभार विठ्ठल वरकड यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री विलास दोलतोडे यांनी केले.



