-->
करमाळाराजकिय

माढा तालुक्यातील विविध विकास कामांचे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते भूमिपूजन.

करमाळा प्रतिनीधी-( उदयसिंह खाटमोडे -पाटील)

करमाळा-माढा मतदार संघातील माढा तालुक्यातील ३६ गावापैकी मौजे – भोसरे ता.माढा येथे आज आमदार स्थानिक विकास निधीतून अंबाबाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे व जि.प.प्राथमिक शाळेस नवीन वर्ग खोल्या बांधणे कामाचे भूमिपूजन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी माजी ता.पं.सदस्य मा.सुरेश बागल, जेष्ठ नेते मा.मधुकर बागल,  डॉ.प्रा.अशिष रजपूत सर, सरपंच मा.सौ.स्वातीताई कुंभार, मा.नितीन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य मा.गणेश बागल, मा.सुधीर बागल, मा.मनोज बागल, मा.रविराज बागल तसेच बहुसंख्ख ग्रामस्थ उपस्थित होते.

 

माझ्या आमदारकीच्या काळातील पहिले दोन वर्ष कोरोना काळात गेले, त्यानंतर जास्तीत जास्त विकास कामावर जोर देऊन माझा मतदारसंघातील मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील आहे.


मा. संजयमामा शिंदे,
आमदार, करमाळा.

About The Author

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close