-->
करमाळा

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत करमाळ्याची वैभवी माकुडे राज्यात प्रथम; नामसाधना मॉडर्न स्कूलचा मान वाढवला

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील नामसाधना मॉडर्न स्कूलची चिमुकली विद्यार्थिनी कु. वैभवी औदुंबर माकुडे हिने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या ज्युनिअर लेव्हलमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यास्पर्धेत UKG मध्ये शिक्षण घेणाऱ्या वैभवीने अवघ्या ६ मिनिटांत ७० पैकी ६७ उदाहरणे अचूक सोडवून सर्वांना आश्चर्यचकित केले. कमी वेळात अचूक गणना करण्याची क्षमता, वेग, एकाग्रता आणि संगणकीय कौशल्य दाखवत वैभवीने अबॅकस क्षेत्रात करमाळ्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

वैभवीने लहान वयात मिळवलेले हे राज्यस्तरीय यश तिच्या परिश्रमासोबतच शाळेच्या गुणवत्ता आधारित शिक्षणपद्धतीचाही दाखला ठरत आहे. नामसाधना मॉडर्न स्कूलने अल्पावधीत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपला लौकीक सिद्ध केला असून, वैभवीच्या या यशामुळे या परंपरेत आणखीनच भर पडली आहे.

 

  या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवानेते व बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी वैभवीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. वैभवीच्या या यशासाठी सहशिक्षिका सौ. कोरडे, सौ. वायकर, सौ. दिवाण, सौ. वीर, कु. बागवान आणि सौ. मेकळकी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close