-->
करमाळासामाजिक

सोलापूर येथील शांतता रॅलीला जाण्यासाठी १०० चार चाकी व दुचाकी गाड्यांना इंधन देणार- प्रा. रामदास झोळ

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे बुधवार दि. ७ ॲागस्ट रोजी शांतता रॅली होनार आहे. या रॅलीसाठी करमाळा तालुक्यातुन मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या बांधवांना १०० चार चाकी गाड्यांसाठी डिझेल व १०० दुचाकी गाड्यांसाठी पेट्रोल मोफत ‌देणार असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले.

 

यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातून तसेच जिल्ह्या बाहेरूनही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने सोलापूर येथे दाखल होणार आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणुन सोलापूर येथे शांतता रॅली काढण्यात येणार असून या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून मराठा समाज, बहुजन बांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपल्याकडून एक खारीचा वाटा म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत म्हणून करमाळा तालुक्यातील नागरिकांना १०० चार चाकी गाड्यांना इंधन व १०० दुचाकी गाड्यांसाठी पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. दुचाकी वाहनधारकांनी शक्यतो जास्तीत जास्त बुलेट गाडी आणण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे.

 

ज्याप्रमाणे मुंबई येथील आंदोलनाला जाण्यासाठी भिगवण येथे इंधनाची सोय केली होती. त्याचप्रमाणे सोलापूरला जाण्यासाठी पुणे सोलापूर हायवे वरती इंधनाची सोय केली जाणार आहे. तरी यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील इच्छुक समाज बांधवांनी प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन करमाळा संपर्क कार्यालय, बारा बंगले, विकासनगर, करमाळा येथे संपर्क करून आपली नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क मोबाईल नं. 9405314296

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close