-->
आरोग्यकरमाळासामाजिक

युवासेनेच्या वतीने हिवरेत उद्या मोफत नेत्ररूग्ण तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन 

 

करमाळा/प्रतिनिधी

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना व अहमदनगर नगर येथील सुप्रसिद्ध आनंदॠषी नेत्रालय यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्या रविवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते दु. ०२ वाजेपर्यंत हिवरे (नागोबाचे) येथे मोफत डोळे तपासणी शिबीर व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले असुन हिवरे सह पंचक्रोशीतील गरजूनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे शाहूराव फरतडे यांनी केले आहे.

 

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन केले असुन प्रवास, जेवण, औषधोपचार, दोन दिवस रहाण्याची सोय, भारतीय भिंग (लेन्स) यासाठी फक्त दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. तसेच ज्यांचे डोळ्याचे मांस वाढले आहे ते मोफत काढले जाणार आहे. 

 

शिबिरात येताना आधार कार्ड, रेशनकार्ड, याचे झेरॉक्स, तसेच सध्या काही आजार असल्यास व त्यावर असलेले उपचार, औषध गोळ्या, डाॅक्टरांचे रिपोर्ट सोबत आणावेत. असे आवाहन आयोजकांडून करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close