
माय मराठी न्यूज


आषाढी एकादशी निमित्त भाजपचे गणेश चिवटे यांच्या हस्ते देवळाली (ता. करमाळा) येथे भाविकांना फराळ वाटप करण्यात आला. देवळाली येथील छत्रपती प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे युवा मंच यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त आज बुधवार दि. १७ जुलै रोजी पंढरपूर येथून येणाऱ्या भाविकांना फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील गरिब, गरजू निराधार, वृद्ध नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना गेली १५ वर्षांपासून दररोज मोफत जेवण देऊन अन्नदान केले जाते. याचाच एक भाग म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथुन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांना आषाढी एकादशी निमित्त गणेश भाऊ चिवटे युवा मंच व छत्रपती प्रतिष्ठान यांच्याकडून फराळ वाटप करण्यात आले. यावेळी पंढरपूरहुन आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहाजी पाटील, संदिपान कानगुडे, सतिषबापु कानगुडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल पवार, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्याराज गोसावी, रमेश गायकवाड, नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, जयंत काळे पाटील, भरत चोपडे, चेतन राखुंडे, लखन शिंदे, किरण गोसावी, राजु जगताप, तात्या जाधव गुरजी, बापू जगताप, देवळाली येथील छत्रपती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



