-->
करमाळाक्राईम

‘या’ कारणामुळे महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

माय मराठी न्युज

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी येथे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव दिपाली कदम असे असून त्या पोलिस नाईक या पदावर सेवेत होत्या.

आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली कदम यांनी भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली होती. त्या सेवेत असलेल्या पोलीस स्टेशन मधीलच पोलिस नाईक कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे दिपाली कदम यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक वाल्मीक अहिरे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृत दिपाली कदम यांचे येत्या १६ नोव्हेंबर रोजी लग्न होते. दिपाली कदम या लग्न करणार असल्याची माहिती मिळताच वाल्मीक अहिरे याने दिपाली यांच्या होणाऱ्या नवरा मुलाला आणि दिपालीच्या भावाला फोन करुन धमकी दिली. अशा या प्रकारामुळे निराश झालेल्या दिपाली कदम यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close