करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


यशकल्यानी सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश (भाऊ) करे पाटील यांचे हस्ते पार्शगायक प्रविणकुमार अवचर यांचे “कमलादेवीच्या दर्शनाला चल” या गाण्याचे लॉन्चिंग अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सेवाभवन येथे करण्यात आले.
नवरात्री निमीत्त मांगी येथील पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांनी ‘करमाळ्याची कमलाई माता’ या गीताचे प्रचंड यशानंतर खुप सुंदर असे दुसरे गीत प्रवीण अवचर व त्यांचे सहकारी यांनी तयार केले आहे. “कमलादेवीचेदर्शनाला चल” हे गीत तयार केले असून ते त्यांनी स्वतः गायले आहे. यासाठी त्यांना गायक प्रफुल्लकुमार दामोदरे व रेकॉर्डिस्ट सागर खरात यांनी ही गायनासाठी साथ दिली आहे. तर संगीत हे करमाळा येथील प्रसिद्ध दोस्ती बेंजो निर्माता नासिरभाई शेख यांनी दिले. रिदम रोहित चव्हाण यांनी केला आहे. तर, कोरस कमलादेवी चे छबिना मानकरी कै. कादर भाई कुरेशी यांचे नातू रौफ कुरेशी यांनी व सहकाऱ्यांनी दिला आहे. अतिशय उत्कृष्ट गायन व वाद्यकाम असणारे हे गीत नक्कीच सर्वांना आवडणार आहे.
यावेळी श्री. गणेश करे पाटील यांनी प्रविणकुमार व त्यांचे पूर्ण टीम चा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. प्रवीण अवचर यांनी दर्जेदार गीत बनवून नवरात्रीची आई कमला भवानी च्या भक्तांना दोन गाण्यांच्या रूपाने विशेष भेट दिली आहे. तरी सर्वांनी या गीताचा आंनद घ्यावा असे आव्हान केले.
भाजपा युवा मोर्चा चे राज्य सचिव श्री. दीपक चव्हाण, मकाई चे संचालक श्री. अमोल पवार, मुंबई पोलीस श्री. मिलिंद दामोदरे, श्री. कुलकर्णी, आमदार संजय मामा चे स्वीय सचिव श्री. जगताप सर, पत्रकार आशपाक सय्यद, संघर्ष न्यूज चे वाघमारे, गायक प्रफुल्लकुमार, सागर खरात, नासिरभाई शेख, आलिंम शेख यांच्यासह इतर उपस्थित होते.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव श्री. दीपक चव्हाण हे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्श्वगायक प्रवीण अवचर यांनी आई कमलाईची दोन दर्जेदार गीत बनवले आहेत. त्यांचं कौतुक करावे तेवढे कमी आहे. असे कलाकार आपल्या करमाळा तालुक्याला लाभले हे आपलं भाग्य आहे. अवचर यांनी खूप सुंदर गीत बनवले आहे. हे गीत सर्वांनी स्वतः ऐकावं आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवावे. महाराष्ट्रासह देशात व परदेशात ही आपल्या करमाळ्याच्या कमला भवानी ची महती सांगणारे गीत पोहोचवायला हवे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाण्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.




