माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


करमाळा तालुक्यामध्ये विजयदादा पवार यांनी संघर्षमय जिवनातून यशस्वी वाटचाल करत सामाजिक चळवळीत योगदान देण्याचे काम केले असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे मत ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले. करमाळा येथील शुभ सकाळ ग्रुपच्या वतीने विजयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ॲड. बाबुराव हिरडे म्हणाले की, विजयदादा पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्पेअर पार्ट दुकानापासून सुरुवात करून त्यानंतर जेसीबी, पोकलेन, जे.के. टायर एजन्सी अशा व्यवसायामधुन उत्कर्ष केला. सामाजिक बांधिलकीतून मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात रणजितसिंह मोहिते पाटील महाविद्यालय स्थापन करून करमाळयातील होतकरू विद्यार्थ्यांना बी.सी.ए, बी.बी.ए, बी.एससी कोर्स चालू केले. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये लोकनेते स्व. दिगंबरराव बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या बरोबर काम केले आहे. याचबरोबर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बरोबर काम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून काम केले. हे काम करताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाबीजवर संचालकपदी त्यांची निवड केली होती. राजकारणात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. कुणाच्या छत्राखाली काम करण्यापेक्षा स्वाभिमानाने आत्मनिर्भरतीने गोरगरिबांची कामे स्वबळावर करण्यासाठी दादा सदैव कार्यरत राहिले आहेत. त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सर्व जाती धर्माचे मित्रपरिवारावर त्यांचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विजयदादांचे जवळचे नातेसंबंध मित्रत्वाचे संबंध आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. अनेक लोकांची निस्वार्थपणे कामे त्यांनी केली आहेत. त्यांचे कार्य करमाळा तालुक्यातील जनतेसाठी व पिढीसाठी प्रेरणादायी आहे. स्वाभिमानी प्रामाणिकपणे काम करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिल्यास समाजाचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही असेही ॲड. बाबुराव हिरडे यांनी सांगितले.
या सत्कार समारंभास उद्योजक मनोज गांधी, डॉ. अनिल मेहता, उद्योजक बाळासाहेब रोडे, पत्रकार दिनेश मडके, उद्योजक शिवकुमार चिवटे, सिध्देश्वर डास यांच्यासह करमाळा शुभ सकाळ ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



