-->
करमाळाराजकियसामाजिक

उन्हाचा पारा वाढत असल्याने प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समीतीला द्या

शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष फरतडे यांची मागणी 

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

उन्हाचा पारा वाढत असल्याने प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समीतीला द्यावेत अशी मागणी हिवरे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभूराजे फरतडे यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत व शिक्षण अधिकारी राजकुमार पाटील यांच्याकडे केली आहे .

 

या बाबत अधिक माहिती देताना फरतडे म्हणाले की

सध्या करमाळा तालुक्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढत असून सकाळी ११ वाजेपर्यंत ३८ ते ३९ डिग्री सेल्सिअस तापमान होत आहे. सध्या सकाळच्या सत्रात शाळा भरत आहेत साडे अकरा वाजता सुट्टी होत आहे मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एक ते दिड किलोमीटर अंतरावरून सायकल किंवा पायी चालत शाळेत येत आहेत ज्या पालकांकडे मोटारसायकल आहे ते स्वतः येऊन मुलांना घेऊन जातात मात्र अनेकांकडे मोटारसायकल नाहीत, शेतातील कामामुळे वेळ भेटत नाहीत त्यामुळे घरी जाईपर्यंत जवळपास बारा वाजून जातात त्यावेळेस तापमान ४२ अंश सेल्सिअस च्या पुढे जात आहे.

 

वाढत्या उन्हाचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहेत, डोके दुखणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे अशा घटना घडत आहेत यामुळे उन्हामुळे विद्यार्थांना इजा पोहचली तर जबाबदार कोण असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे.

 

 

त्यामुळे स्थानिक पातळीवर पालकांशी समन्वयक साधून शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समीतीला देण्यात यावेत विद्यार्थी हिताच्या या मागणीचा संबंधित विभागाकडून सकारात्मक विचार होऊन निर्णय व्हावा हि अपेक्षा आहे असे फरतडे यांनी म्हटले आहे

 

सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे

एवढा महिनाभर सकाळी शाळा लवकर भरवा परंतू साडे दहा वाजता शाळेला सुट्टी दिली पाहीजे – गणेश जाधव गौंडरे (पालक)

 

शाळेपासून आमची वस्ती दोन किलोमीटर अंतरावर आहे

साडे अकराला शाळा सुटल्यावर घरी यायला मुलांना बारा वाजून जात आहेत, ऐवढ्या उन्हात तिसरी चौथीच्या मुलांनी कसं चालत यायचं त्यामुळे उन्हाची तीव्रता बघून वेळेत बदल करणे गरजेचे आहे .स्वामी खडके- हिवरे (पालक)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close