-->
करमाळाविशेष

श्री उत्तरेश्वर विद्यालयात NMMS सारथी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

केम (ता.करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयातील सन २०२२-२३ मधील NMMS सारथी स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज शुक्रवार दि. २२ मार्च रोजी शालेय व्यवस्थापन समिती तर्फे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष श्री सचिन रणशृंगारे, उपाध्यक्ष गणेश तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण गुरव यांच्या हस्ते प्रतिक्षा कळसाईत राष्ट्रीय स्कॉलरशिपधारक, वैष्णवी तळेकर, भाग्यलक्ष्मी तळेकर, वैभवी तळेकर, माहि तळेकर, भाग्य दोंड, शिवराज गायकवाड, सम्राज्ञी तळेकर या सारथी स्कॉलरशिपधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी NMMS परीक्षेला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री टि.व्ही पवार सर, श्री जी.के जाधव सर, सौ. नरखेडकर मॅडम, कोंडलकर सर‌ यांचाही सत्कार शालेय व्यवस्थापन समिती व प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस. बी सर यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री के. एन वाघमारे सर यांनी केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close