भीमा नदी काठावरील शेती पंपाचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा अन्यथा..; युवासेनेचा ईशारा
माय मराठी न्यूज नेटवर्क


शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ताभाऊ साळुंखे यांच्या वतीने संगम येथे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा निषेध करण्यात आला. तसेच दोन दिवसात भीमा नदी काठावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरुळीत न केल्यास महावितरण कंपनी अकलूज येथे आत्मदहन करण्यात येईल. असा ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.
उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी भीमा नदीतून सोडले आहे, त्यामुळे भीमा नदी काठचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीचा संगम (ता.माळशिरस) येथे घोषणा बाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हामुळे पिके करपून चाललेली आहेत. त्यात विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे आहे ही पिके पण जळून जात आहेत. शेतकऱ्यांची पिके जर जळून किंवा करपून गेली तर शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. भीमा नदीमध्ये सोलापूरला पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले होते. पण आधीच भीमा नदी मध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात होते. आणी ज्या ठिकाणी पाणी कमी होते अशा ठिकाणी नदी पत्रात शेतकऱ्यांनी खड्डे खोदून मोटारी चालवत होते. त्यामुळे आपण उजनी धरणातून सोडलेले पाणी शेतकरी शेतीसाठी उपसा करत नाहीत. जो आधीचा शिल्लक पाणी साठा होता त्याच पाणी साठ्याचा उपसा शेतकरी करत आहे. त्यामुळे भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा तात्काळ चालू करण्यात यावा. अशी मागणी महावितरण कंपनीकडे युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे, अन्यथा दोन दिवसात युवा सेनेच्या वतीने आत्मदहन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी गणेश इंगळे यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांचे नेते विठ्ठल आबा मस्के, नारायण इंगळे, कल्याण इंगळे, बबन पराडे, प्रशांत पराडे, सचिन पराडे, गणेश काळे, सुभाष पराडे, सचिन भोसले, सचिन ताटे, देशमुख, अजिनाथ पराडे, मगण भोई, विकास भोई, बापू भोई, प्रवीण पराडे, ओम पराडे, अविनाश पराडे, लाव्हा पराडे, नवनाथ इंगळे, दिपक भोई, ओम पराडे, नितीन इंगळे, सिधू गायकवाड यांच्यासह आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.



