-->
आरोग्यकरमाळाराजकिय

जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्यास मंजूरी; मकाईचे संचालक गणेश झोळ यांची माहिती

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे (ता. करमाळा) येथे स्थलांतरित करण्यास जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूरी मिळाली आहे. अशी माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश झोळ यांनी दिली.

 

यावेळी बोलताना झोळ यांनी सांगितले की, जेऊर ता. करमाळा येथे ग्रामीण रुग्णालय झाले असल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरित करण्याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कडे मागणी होती. त्या मागणीची सकारात्मक दाखल घेत प्रा. सावंत यांनी आरोग्य विभागास स्थलांतरण करण्याचे आदेश दिले होते.

 

आरोग्य विभागाने सर्व बाबींची तपासनी करुन जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तिन्ही समित्यां कडून मंजूरी मिळाली असून वरिष्ठ कार्यालया कडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे वाशिंबे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला असून इमारत बांधकामासाठी व कर्मचारी वसाहती साठी सहा कोटी हून अधिक निधी शासनाकडून मिळणार आहे. या स्थलांतरणासाठी सरपंच तानाजी झोळ यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने लागणारे सर्व ठराव देऊन तसेच आ. संजयमामा शिंदे यांचे शिफारस पत्र देऊन सहकार्य केले असेही झोळ यांनी सांगितले.

 

वाशिंबे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरणास मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील रुग्णांवर तज्ञ डाॅक्टरांकडून विना शुल्क उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे वाशिंबे ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

वाशिंबे प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टर, नर्सेस, कंपाउंडर तसेच इतर सेवक वर्ग असून याअंतर्गत चिखलठाण, केडगाव, कोंढेज, शेटफळ, वाशिंबे या उपकेंद्रांचा समावेश आहे. एकुण १७ गावातील ३९.८६६ लोकसंख्येचा समावेश आहे. वेगवेगळ्या साथीच्या रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य कार्य आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close