-->
करमाळामहिलाविषयक

जेऊर येथील महिला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उखाणे व रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न 

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

जेऊर (ता. करमाळा) येथे माजी आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व जेऊर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. त्यानिमित्त आजच्या दिवशी सर्व प्रथम उखाणे स्पर्धा पार पडली. यात महिलांनी ऐच्छिक, अक्षरावरुन सुरु होणारा उखाणा आणि एका विशिष्ट शब्दाचा समावेश असलेला उखाणा या तीनही राऊंड मध्ये खुप छान उखाणे सादर‌ केले.

 

काही उखाणे हे पौराणिक महत्व सांगणारे तर काही उखाणे विनोदाची झालर असलेले होते. अक्षराने सुरु होणाऱ्या उखाण्यासाठी परिक्षकांकडून कुंकू हा शब्द स्पर्धकांना देण्यात आला. यावेळी संपुर्ण देशाला सौभाग्याचे लेणे म्हणून माहिती असलेल्या करमाळा तालुक्यातील केम या गावाचा उल्लेख करण्यात आला. केम गावाची कुंकु निर्मिती मध्ये असलेली छाप या महोत्सवात देखील‌ दिसुन आली.

यानंतर रांगोळी स्पर्धा पार पडली. यात पाणी काटकसरीने वापरा, सावित्रीबाई फुले पोर्टेट, मुलगी जन्मली घरी लक्ष्मी आली यासह अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षण रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शेवटी फनी गेम्स घेण्यात आल्या. यात सौ. जोतीताई नारायण पाटील‌ सहभागी झाल्याने महिलांचा उत्साह द्विगुणित झाला.

 

यावेळी कु. रिया सुतार आणि कु. समीक्षा कुलकर्णी यांनी स्पर्धा चे सुरेख सुत्रसंचलन केले. जेऊर व परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहुन आज दुसऱ्या दिवशी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close