
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


श्रीराम भक्त हनुमानाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुगांव (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माहे- फेब्रुवारी २०२४ ची शिक्षण परिषद गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी उपस्थीत असलेले करमाळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब, करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील साहेब, जेऊर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे साहेब, चिखलठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. वंदना पांडव मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुगांवच्या सरपंच सौ. सुवर्णाताई महादेव पोरे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे उपसरपंच प्रकाश डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पोरे, उपाध्यक्ष निखिल अवघडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महादेव अवघडे, परबत कामटे, विठ्ठल कामटे, तुकाराम अवघडे, जैनुद्दीन शेख, अशोक गावडे, सचिन गायकवाड, सचिन कदम, रत्नदीप ओहोळ, इकबाल शेख, पालक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी छत्रपती मरवडे परिवाराचा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा पुरस्कार वांगी नं.२ या शाळेस मिळाला, त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पोपळघट सर व शिक्षक वृंद यांचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दिपक लांडगे सरांनी यश प्राप्त केल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच गव्हाणे वस्ती शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती. हांडे मॅडम यांना आदर्श शिक्षक समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला व उपस्थित शिक्षक, शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचलन नवनाथ मारकड सर यांनी केले. तर शिक्षण परिषदेचे आयोजन व नियोजन शाळेचे मुख्याध्यापक दादा सय्यद सर, नवनाथ मारकड सर, साधना बारकुंड मॅडम, दादाभाऊ येवले सर, रेश्मा खरात मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन जि.प.प्राथ.शाळा वांगी नं.२ या शाळेचे जेष्ठ शिक्षक, उत्कृष्ट निवेदक फौजमल पाखरे सर यांनी केले.
कुगाव येथील शिक्षण परिषदे मध्ये दादा बोराटे सर यांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व CCE याविषयी मार्गदर्शन केले. तर सुहास गुळवे सर
यांनी उल्हास ॲप अर्थात नव- साक्षरता प्रबोधन व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच केंद्रप्रमुख श्रीमती. वंदना भारत पांडव मॅडम यांनी प्रशासकीय विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुगांव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचेकडून शिक्षण परिषदेस उपस्थित असलेल्या सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.



