-->
करमाळाराजकियसामाजिक

भाजपाच्या ओबीसी मोर्चा करमाळा तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मण शेंडगे यांची निवड

 

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

भारतीय जनता पार्टीच्या करमाळा तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी दहिगाव (ता. करमाळा) येथील श्री. लक्ष्मण हरी शेंडगे यांची निवड भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले.

 

या निवडी प्रसंगी बोलताना शेंडगे म्हणाले की, आगामी काळात जनसामान्यांमध्ये जाऊन सर्वांना सोबत घेत पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी जोमाने काम करून पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ओबीसी समाजाचे प्रश्न व अडीअडचणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडवून समाजाला न्याय देणार आहे.

 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, पोपळज गावचे सरपंच बिभीषण गव्हाणे, झरेचे युवा नेते सोमनाथ घाडगे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, महादेव शेंडगे, दशरथ आबा शेडगे, मारुती नाना वाघमोडे आदी भाजप पदाधिकारी परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close