
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी निमगाव (ह) येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमोल (आप्पा) भोसले यांची निवड आमदार संजयमामा शिंदे, मा.आ.जयवंतराव जगताप व तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांच्या हस्ते झाली आहे. अमोल भोसले हे अनेक वर्षापासून समाजकार्यात अग्रेसर आहेत. तसेच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक इत्यादी आयामांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी अनेक वेळा गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने करमाळा तालुका उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. यानिमित्त निमगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी निवडी बाबत बोलताना ते म्हणाले की, पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणार असून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार आहे. तसेच त्यांनी दिलेल्या पदाचा गोरगरीब गरजु लोकांच्या कामासाठी योग्य वापर करुन जनतेची सेवा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या निवडी वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर, राजेंद्र शिंगण, सिद्धेश्वर जगदाळे, श्रीराम रोकडे, हनुमंत जगदाळे, सोमनाथ हलकरे, दादासाहेब भोसले, विक्रम कुंभार, शत्रुघ्न शिंगण, श्रीराम निळ, शाहजी साबळे, विशाल निळ, नवनाथ रोकडे, शहाजी साबळे, सौरभ निळ, ऋषिकेश चव्हाण, नितीन जगताप, बाबासाहेब जगताप,राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




