राणा नोबल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील ईगल लीप प्रीस्कूल आणि राणा नोबल इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानगर करमाळा चे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे विद्या विकास मंडळाचे मानद सचिव विलासरावजी घुमरे सर, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर, कोमलताई घुमरे मॅडम, संगीत स्वर ताल विद्यालयाचे अध्यक्ष नराळे सर, पी. एस. आय. श्री विनायक माहूरकर सर, आदलिग सर, श्री गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री महेश दिवेकर, खजिनदार श्री भाऊसाहेब दिवेकर, कमल दिवेकर, उपाध्यक्ष विजय बागल, मुख्याध्यापक स्वप्नाली बागल, विभाग प्रमुख पाटील सर, शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रीती शिंदे मॅडम हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.श्री गणेश करे पाटील यांनी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत प्रत्येक मुलांना सर्टिफिकेट व मेडल तसेच शाळेला एलईडी टीव्ही देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, वेलकम सॉंग सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात केली, मराठमोळी गाणी, हिंदी चित्रपटातील गाणे, शिवाजी महाराज जीवन कथा, विठ्ठल रुक्मिणी थीम, शेतकरी थीम, इंदुरीकर महाराज थीम, मुलींचे बालपण अशा विविध पारंपरिक नृत्यातून बाल विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती सादर करीत आगळे वेगळे वार्षिक संस्नेहसंमेलन पार पाडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमृता यादव मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचा आनंद बालचमुनी चांगल्या प्रकारे घेतला व आपली वेगवेगळी कला सादर केली. या कार्यक्रमास सर्व पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




