-->
करमाळाविशेष

वांगी नं.३ येथील चिमुकल्यांच्या बालआनंद बाजारात ३८६५० रुपयांची उलाढाल

 

करमाळा/प्रतिनिधी

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नं. ३ (ता. करमाळा) येथे आज शनिवार दि. २० जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांच्या या बालआनंद बाजारात तब्बल ३८६५०/- रुपयांची उलाढाल झाली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय रोकडे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मयूर रोकडे हे उपस्थित होते.

 

या बालआनंद बाजारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फळे, पालेभाज्या, फळभाज्या, अंडी, वडापाव, भजी, चायनीज, भेळ, चहा यांची दुकाने लावली होती. गावात प्रथमच बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे लहान मुलांना व्यवहार ज्ञान समजले. तसेच आपण व्यवसाय करू शकतो याचा आत्मविश्वास आला.

 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपाध्यक्ष लक्ष्मण गोडसे, मारुती रोकडे, दत्ता कुदळे, जयवंत सातव, नागेश खराडे, मनोज तळेकर, बाळासाहेब कांबळे, प्रकाश तेलंग नागनाथ वाघमोडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदिनाथ राऊत सर, श्रीमती उज्वला भोंग मॅडम, अशोक कणसे सर, बाळू राठोड सर व सुतार मॅडम यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close