
करमाळा/प्रतिनिधी


प्राणी, माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्यासारख्या वाईट प्रथा म्हणजेच अंधश्रद्धा आहे. असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अनिल माने यांनी केले आहे. पोथरे (ता. करमाळा) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर प्रसंगी ते बोलत होते. आज शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी पोथरे येथे दुसऱ्या सत्रातील अंधश्रद्धा निर्मुलन या विषयावरील व्याख्यान पार पडले.
या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, अंधश्रद्धा, जून्या रूढी-परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचा इतर प्राणी, माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्यासारख्या प्रथा म्हणजे अंधश्रद्धा आहे. अशा गोष्टीची कृती व कल्पना करणे चुकीचे आहे. असेही त्यांनी यावेळी पोथरे येथील आयोजित कार्यक्रमात सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब साळुंखे, हांडे साहेब, पल्लवी निकम, सरपंच अंकुश शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, मुख्याध्यापक गुरव सर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे, प्रा. प्रदीप मोहिते, प्रा. आनंद शेळके, प्रा. सुधीर मुळीक, प्रा. एल.बी पाटील, प्रा. विजया गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.




