-->
करमाळामहिलाविषयकसामाजिक

मांगी येथील गरीब कुटुंबातील मजुराची मुलगी झाली पुणे पोलीस

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

गरीब कुटुंबात मुलींना कसेबसे प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण मिळते व नंतर आर्थिक अडचणी मुळे आई वडील आपल्या संसाराच्या गाड्याला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्या मुलीला शाळेतून घरी ठेवुन मोल मजुरीसाठी लावतात. कारण आर्थिक परिस्थिती नाजूक असते. पुढे मुलीचे लग्न करून देण्याचे पण मोठे आव्हान असते. भविष्याचा विचार करून मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवावे लागतात. या प्रपंचाचा खूप खडतर प्रवास असतो.

करमाळा तालुक्यातील मांगी येथील रहिवाशी श्री. मधुकर अवचर हे गावात मोल मजुरी व गवंडी काम करतात. त्यांची पत्नीही दुसऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजुरीचे काम करतात. अशाच परिस्थितीत अवचर यांनी मात्र, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलीच शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे पोलीस भरती पूर्व शिक्षण सुरू केले. कु पूजा अवचर ही देखील अभ्यासात फार हुशार होती. त्यामुळे हे आव्हान तिने सहज स्वीकारले. कु पूजा हिने ठरवले होते की, पोलीसच व्हायचं आणि त्या दिशेने तिने रात्र न दिवस मेहनत करून अखेर हे यश मिळविले. खरेतर बिकट परिस्थितीवर मात करून पुढे कसे जायचे हा एक आदर्श या कुटुंबाने समाजात दाखवून दिला आहे.

 

मांगी या गावातील पहिलीच मुलगी पुणे पोलीस झाली आहे. ही गावाला पण अभिमान वाटणारी बाब आहे. ही निवड झाल्यामुळे करमाळा तालुक्यासह मांगी गावातून कु. पूजा अवचर वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आमदार श्री. संजय मामा शिंदे, मकाईचे चेअरमन श्री. दिग्विजय बागल, श्री. संभाजी राजे बागल,
सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजित तात्या बागल, पुणे येथील उद्योजक अशोक सेठ नरसाळे,
पार्श्वगायक प्रवीण अवचर आदींनी कु. पूजा अवचर व तिचे कुटुंबाचे विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच येत्या ०६ जानेवारीला कु. पूजा अवचर हीचा मांगी ग्रामस्थांकडून विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close